
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.७: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी राजेवाडी, ता. सातारा येथील एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की निलेश बबन भोसले रा. राजेवाडी, ता. सातारा याने वाईट हेतूने एका तीस वर्षीय महिलेशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तुझे व माझ्या असलील संबंधाचे पुरावे आहेत. तुझी बदनामी करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने संबंधित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर निलेश भोसले याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
