गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणार्‍या बर्थडे बॉयसह 12 जणांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 2 : जिल्हा लॉकडाऊन असूनही गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणार्‍या बर्थ-डे बॉयसह 12 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे राहूल चव्हाण हे गस्तीवर असताना त्यांना दि. 1 रोजी सायंकाही 8 वाजता शनि मारुती मंदिराजवळ काहीजण गर्दी जवमून वाढदिवस साजरा करत असल्याचे समजले. त्यानंतर त्याठिकाणी गेले असता पोलिस गाडी आल्याचे पाहून वाढदिवस साजरा करणारे तेथून पसार झाले. दरम्यान त्याठिकाणी शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि शितोळे, कुंभार, बाबर त्याठिकाणी ठिकाणी आले. पोलिसांनी चौकशी केली असता विजय पावटे रा.634 , शनिवार पेठ , सातारा ( वर्थडे बॉय ) यांचा बर्थडे असुन त्यावेळी त्याचे सोबत बर्थडे साजरे करणारे अभिराज महेश घोडके, व्यंकटेश धनंजय पावटे, हेम अशोक जानी, रजत महेश घोडके, सिध्दांत किशोर जानी, साहिल गणेश राजेपाध्ये, स्वयंम रोहित गवळी, महेश अरुण कारंजकर, कुणाल गवळी, किरण गवळी, आदित्य गजानन घोडके सर्व रा. शनिवार पेठ सातारा असे 12 जणांची नावे समोर आली. हे सर्वजण लॉकडाऊनचा आदेश मोडून गर्दी जमवून वाढदिवस साजरा करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!