फलटण तालुक्यासाठी कोरोना कंट्रोल रूम तयार करा; मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचे आदेश


स्थैर्य, फलटण, दि. २१ : सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चालला असून आगामी काळामध्ये कोरोना रुग्णांची तपशीलवार माहिती मिळण्यासाठी व कोरोनाबाधित रूग्णांना व नातेवाईकांना सहकार्य करण्यासाठी फलटण पंचायत समिती येथे कोरोना कंट्रोल रूम तातडीने तयार करण्यात यावी, असे आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले.

फलटण तालुक्यातील कोरोना आढावा बैठक ही मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली फलटण पंचायत समिती येथे संपन्न झाली. त्या वेळी CEO गौडा बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, उपसभापती सौ. रेखा खरात, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी विनायक गुळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना बाबतीत असलेली रॅपिड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आरटीपीआर चाचणी करणे गरजेचे नाही. तरी फलटणमध्ये रॅपिड टेस्ट न करता आरटीपीआर चाचण्यांवर भर द्यावा व आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात मधून कोरोना कसा रोखता येईल, याबाबत सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

फलटण तालुक्यामध्ये कोरोनाची चाचणी करताना संबंधित रुग्णांचा मोबाईल नंबर हा घेणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सुलभ होईल. यासोबतच फलटण तालुक्यामध्ये आरटीपीसीआर टेस्ट या वाढवणे गरजेचे आहे. होम आयसोलेशन मधील पेशंटला योग्य ते लक्ष ठेवून त्यांना औषधोपचार देतानाही जिल्हा परिषद शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे, असे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यामधील ग्रामीण भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी ग्रामस्तरावर ग्राम दक्षता कमिटीचे सहकार्य घेणे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम आहे. आशा कर्मचारी यांना हो होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या कोरोना बाधित पेशंटला एक दिवसात भेट देणे ही बंधनकारक करणे आवश्यक आहे. यावेळी आशा सेविकांनी त्यांच्या आरोग्य विषयक काळजी घेवुन कोरोनाबाधित रूग्णांना उपचार द्यावेत, असे मत फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!