धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठ्याच्या स्वच्छतेचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण’ या विषयावर श्री. गणेश शेंडे यांच्या गोठयावर प्रात्यक्षिक करून माहिती दिली.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृध्दी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले, श्वेता सस्ते यांनी शेतकर्‍यांना गोठा निर्जंतुकीकरणाचे जनावरांच्या आरोग्यावर होणारे फायदेही सांगितले व शेतकर्‍यांच्या प्रश्नांची कृषीकन्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमास शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!