
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेतून मानेवाडी (ता. फलटण) गावचे सुपुत्र श्री. शशिकांत बाजीराव जाधव यांची तहसीलदारपदी निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मानेवाडीचे सरपंच राजेंद्र जाधव, उपसरपंच मच्छिंद्र कदम, रामभाऊ ढेकळे, रवींद्र पिसाळ, प्रा. वसंतराव माने, कीर्तीकुमार बनकर, बाजीराव जाधव, अक्षयकुमार माने, सतीश जाधव, अनिल कदम उपस्थित होते.
