फलटण मध्ये कोविड लसीकरण पहिला डोस पूर्ण, दुसरा डोस ८५ % हुन नागरिकांना दिला : डॉ. पोटे


दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । फलटण । फलटण शहर व तालुक्यात कोविड लसीकरण पहिला व दुसरा डोस प्रक्रिया अत्यंत उत्तम पद्धतीने कार्यान्वित असून संरक्षक डोस (बुस्टर) प्रक्रियाही सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी सांगितले.

१५ ते १७ वयोगटातील मुलांचे उद्दिष्ट १६ हजार ६८१ असताना पहिला डोस १८ हजार ९९५ मुलांना देण्यात आला, ११३.८७ % काम झाले तर दुसरा डोस केवळ २२३३ म्हणजे १३.३८ % मुलांना देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील स्त्री पुरुषांचे उद्दिष्ट १ लाख १९ हजार ८३४ इतके होते त्यापैकी १ लाख २० हजार ९२४ म्हणजे १००.९० % स्त्री पुरुषांना पहिला आणि १ लाख ६३६ म्हणजे ८३.९७ स्त्री पुरुषांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

४५ ते ५९ वयोगटातील स्त्री पुरुषांचे उद्दिष्ट ८० हजार ६ इतके होते त्यापैकी ७९ हजार ८३६ म्हणजे ९९.७८ % स्त्री पुरुषांना पहिला आणि ६५ हजार ५३१ म्हणजे ८१.९० % स्त्री पुरुषांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

६० वर्षावरील ५३ हजार ७४२ स्त्री पुरुषांचे उद्दिष्ट होते त्यापैकी ५५ हजार १४३ म्हणजे १०२.६० स्त्री पुरुषांना पहिला आणि ४९ हजार १०९ म्हणजे ९१.३७ % स्त्री पुरुषांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४८७ आरोग्य कर्मचारी, ५९६ फ्रंट लाईन वर्कर आणि ६० वर्षावरील १०६० स्त्री पुरुषांना संरक्षक डोस (बुस्टर) डोस देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!