
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आगामी ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजेवर जाऊन राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
स्थैर्य, सातारा, दि.१६ ऑक्टोबर : न्यायव्यवस्था सुरळीत चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांवर योग्य निर्णय होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सामूहिक रजेमुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
या आंदोलनामुळे ५ नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध न्यायालयांमधील दैनंदिन कामकाज आणि सुनावणी प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासकीय पातळीवर काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.





