शासकीय वसतिगृहामध्ये बाल लैंगिक अत्याचार बाबत समुपदेशन कार्यक्रम संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये बाल लैंगिक अत्याचार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम कायदा 2012 (पोक्सो ॲक्ट) प्रशिक्षण आणि जनजागृती बाबत फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन (मुस्कान) संस्थेमार्फत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन मुस्कान या संस्थेच्यावतीने शासकीय वसतिगृहातील प्रवेशितांना लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय ? त्याची शक्यता कोठे जास्त असते, अशा परिस्थितीमध्ये बालकांनी व पालकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी, या कायद्यांतर्गत कोठे दाद मागता येते तसेच पोक्सो कायद्यातील तरतुदी, शिक्षा या बाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी गुड टच-बॅड टच याबाबत माहिती होण्यासाठी चित्रफित दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेसाठी मुस्कान संस्थेच्या प्रतिनिधी दिपाली दंडवते, धनश्री पाटील आणि श्रावस्ती साळवे यांनी मार्गदर्शन केले.

Back to top button
Don`t copy text!