कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाईल; नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे; ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. २१: आजच्या परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यात मध्ये कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर बनत चालली आहे. फलटण शहरातील सर्व खाजगी व सरकारी कोरोना रुग्णालये व कोरोना केअर सेंटर पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. कुठेही बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच ऑक्सिजनचा व रेमडीसीवीर इंजेक्शनचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील कोरोना रुग्णांवर उपचार होऊ शकत नाही. रुग्ण संख्या वाढिस आपण सर्वजण जबाबदार आहोत. प्रशासनाने अनेक वेळा कोरोना पासून दूर राहण्याचे अनेक मार्ग आपणास सांगितले आहेत. तरी देखील आपण गंभीर न होता उगीचच काहीसुध्दा काम नसताना रस्त्यावर फिरत आहोत. चौका चौकात कट्ट्यावर बसत आहोत. प्रशासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवित आहात म्हणूनच खऱ्या अर्थाने आज ही परिस्थिती गंभीर बनली आहे. भविष्यात आपण यावर गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर ही परिस्थिती आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर जाऊ शकते असे मत विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांनी ठरवले की आपण कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करावयाचे तरच ही साखळी १५ दिवसाच्या आत खंडित होऊ शकते. त्यासाठी कितीही महत्वाचे काम असेल तरी शक्य तेवढे जास्तीत जास्त सुरक्षित अंतर ठेवा, मास्क घाला, प्रवास करणे टाळा व शक्यतो लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या. काही दिवस घरीच थांबा. हेच कोरोना काळातील सर्वात मोठे योगदान आहे. एवढे कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडले तर आणि तरच आपला या महामारी संकटापासून बचाव होऊ शकतो असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!