
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : वडले ता. फलटण येथे करोनाचा आता आणखी एक नवीन रुग्ण सापडल्याने तालुक्यामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. फलटण तालुक्यात करोना म्हणजेच कोव्हीड 19 या आजाराने अर्धशतक केले असून एकूण करोना बाधितांची संख्या 50 वर पोहचली आहे. त्या मध्ये आज रोजी बाधित असलेल्या रुग्णांची संख्या 32 असून आजपर्यंत 14 जण करोनामुक्त झालेले आहेत तर चौघांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
