कोरोना लस सुरक्षित; नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे : पांडुरंग गुंजवटे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ६ : 45 वर्षावरील ते 59 वर्षे वयोगटातील कोमोर्बीड (ह्दयरोग, मधुमेह, दुर्धर आजार) असणाऱ्या व्यक्तींना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण देण्यात येत आहे. या लसीसाठी नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करुन आपल्या नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण सत्राच्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी केलेले आहे.

माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी नुकतीच लस घेतांना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. नागरिकांनी ऑन लाईन रजिस्ट्रेशन करावे. फलटण शहरात असणाऱ्या लोक सेवा केंद्रा (सीएससी केंद्र) मध्येही रजिस्ट्रेशन करता येईल. ४५ वर्षावरील व्याधी असणाऱ्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असेही नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!