लस घेऊनही झाला कोरोना :​​​​​​​ व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह


 

स्थैर्य, दि.५: हरियाणाचे मंत्री अनिल विज शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 20 नोव्हेंबरला अंबालाच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना तिसऱ्या फेजच्या ट्रायलनुसार को-व्हॅक्सीन डोज देण्यात आला होता. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घेण्याची मागणी केली आहे.

अनिल विज यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी अंबाला कँटच्या एका सिव्हिल रुग्णालयात दाखल आहे. तसेच माझ्या संपर्कातील लोकांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घ्यावी.’

कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या परीक्षणासाठी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी 14 दिवसांपूर्वीच अंबालामधील हॉस्पीटलमध्ये स्वतः भारत बायोटेकची Covaxin लस घेतली होती. अनिल विज यांनी व्हॅक्सीनच्या तिसऱ्या ट्रायलसाठी वॉलंटियरसाठी आपले नाव दिले होते. Covaxin चे तिसरे ट्रायल सुरू झाल्यानंतर देशभरात एकूण 25,800 जणांवर या व्हॅक्सीनचे ट्रायल झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!