फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना चाचणी; ५० पैकी ७ रुग्ण आले पॉझिटिव्ह


फलटण नगरपरिषद व फलटण शहर पोलीस स्टेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम; ७ रुग्णांची १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात रवानगी

स्थैर्य, फलटण, दि. १९ : फलटण शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कोरोणा बाधित रुग्णांची संख्या आढळून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध जाहिर केले आहेत. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत, असे विनाकारण फिरत असणारे नागरिकांची आज फलटण नगरपरिषद प्रशासन व फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आली. यावेळी जवळपास ५० नागरिकांची कोरोना चाचणी केली, यामध्ये जवळपास ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर व शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ : कोरोनाची चाचणी करताना आरोग्य अधिकारी व कर्मचारी.

पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना रुग्णांची रवानगी जाधववाडी येथे उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर मध्ये करण्यात आली आहे. त्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना १४ दिवस विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे ही माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे. फलटण नगरपरिषद व शहर पोलीस स्टेशनने हातामध्ये घेतलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे फलटण तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उभे असलेले नगरपरिषद, आरोग्य व पोलीस अधिकारी व कर्मचारी

यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. आता विनाकारण फिरणारे नागरिकांची संख्याही कमी होऊन कोरोना प्रसारास काही प्रमाणात आळा बसू शकतो, अशी प्रतिक्रिया शहरातील सर्व नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.


Back to top button
Don`t copy text!