फलटणमध्ये रॅपिड अँटी जेन टेस्ट मध्ये १० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यामध्ये १० स्त्री/पुरुष रॅपिड अँटी जेन टेस्ट द्वारे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आलेले आहेत. त्यामध्ये मलठण येथील २८ वर्षीय तरुण, ५० व ३० वर्षीय महिला, ठाकुरकी येथील ७५ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील २० वर्षीय तरुण व ४७ वर्षीय पुरुष, वडजल येथील ४८ वर्षीय पुरुष, सासवड येथील २७ वर्षीय तरुण, रविवार पेठ फलटण येथील ४५ व ५२ वर्षीय पुरुष अशा १० जणांचा समावेश आहे. नगर परिषद, पोलीस व महसूल खात्यातील अनुक्रमे १०, १५, ३८ कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली त्यामध्ये नगर परिषद १ कर्मचारी पॉझीटीव्ह आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८.३० मिनिटांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!