फलटण पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदी संजय कापसे यांना संधी देण्याची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व बांधकाम उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांचे समर्थक संजय कापसे यांना फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्यपदी संधी देण्याची मागणी पूर्व भागातून होत आहे.

स्थैर्य, निंबळक, दि. २४ नोव्हेंबर : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच निंबळक येथील रहिवासी व राज्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे युवा नेतृत्व संजय कापसे यांना फलटण पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदी संधी मिळावी, अशी मागणी फलटण पूर्व भागातून होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील अनुभव आणि वारसा संजय कापसे यांनी निंबळक ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद आणि फलटण पंचायत समितीचे सदस्यपद भूषवून स्थानिक स्वराज्य संस्थांवर चांगले काम केले आहे. राजकारण व समाजकारणाची आवड असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या घराला राजकीय वारसा असून, त्यांच्या मातोश्रीदेखील निंबळक गावच्या सरपंच होत्या.

पक्षातील वाटचाल आणि तरुण वर्गाची मागणी संजय कापसे फलटण पंचायत समितीचे सदस्य असताना त्यांनी राजे गटातून खासदार गटात प्रवेश केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत कापसे यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र राजकीय समीकरणांमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नसली, तरी त्यांनी निवडणुकीत धडाडीने काम केले होते. यंदा त्यांना फलटण पंचायत समितीचे स्वीकृत सदस्यपद मिळावे, अशी मागणी तरुण वर्गातून जोर धरत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!