मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणजितदादांकडून नागपुरात सहकुटुंब सदिच्छा भेट!

राजकारणापलीकडच्या जिव्हाळ्याच्या व कौटुंबिक स्नेहबंधाचे घडले दर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुटुंबासह नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कौटुंबिक सदिच्छा भेट घेतली.

स्थैर्य, नागपूर, दि. २४ नोव्हेंबर : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि स्नेहपूर्ण भेटीदरम्यान सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज उद्योग समूहाच्या संचालिका कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कु. इंदिराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहेत. आजची ही भेटदेखील पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाची होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न होता, दोन्ही कुटुंबांमधील स्नेहबंध आणि आपुलकीचा ओलावा पाहायला मिळाला. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा वाढदिवस फलटण येथे रणजितदादांच्या निवासस्थानी साजरा केला होता, यावरूनच दोन्ही नेत्यांमधील अतुट मैत्री आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची प्रचिती येते.

या भेटीदरम्यान रणजितदादांच्या दोन्ही सुकन्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीबाबतही आस्थेने चर्चा झाली. कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतेच लंडन येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले असून, सध्या त्या स्वराज उद्योग समूहात संचालिका म्हणून अत्यंत जबाबदारीने व यशस्वीपणे कार्यरत आहेत. तर कु. इंदिराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर या सध्या आपले उच्च शिक्षण घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघींच्याही भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

व्यस्त राजकीय वेळापत्रकातून वेळ काढून घेतलेल्या या कौटुंबिक सदिच्छा भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबातील ऋणानुबंध अधिक दृढ असल्याची प्रचिती पुन्हा एकदा फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याला बघायला मिळाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!