वाई आगारातील वाहकाचा कोरोनाने घेतला बळी मुंबईहुन ड्युटी करून आल्यानंतर त्यांना त्रास होत होता


 


स्थैर्य, वाई, दि.२५: वाई आगारातील कर्मचारी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खात आहेत.ड्युटी करायला विरोध केला तरीही कामावरून कमी करण्याची भिती आहे.वय जास्त असून ही मुंबई शहरात ड्युटीला लावलेले वेळे गावचे वाहक दिलीप जाधव यांना गेल्या आठवड्यात कणकणी जाणवू लागली.ते रजेचा अर्ज घेऊन गेले होते पण त्यांचा अर्ज फेकून दिल्याने ते ढसाढसा रडले.तो अर्ज तसाच ठेवून त्यांनी तो दिवस कसा तरी काढला अन त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्याला हलवले.त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून या प्रकाराबद्दल आगार प्रमुख गणेश कोळी यांना विचारले असता त्यांना रजा दिली होती.ते कामावर नव्हते.कोरोना बाधित रुग्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्ती केली जात नाही, असे त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात होणार इंग्लंड विरुद्ध क्रिकेट मालिका; पाहा कधी होणार सामने


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!