कोरोनाने दिवसभरात १२ जणांचा मृत्यू


 

स्थैर्य, सातारा, दि. ११ : कोरोनामुळे सुरू असलेल्या मृत्युसत्राने सातारा जिल्ह्याचा थरकाप उडाला असून आज एका दिवसात कोरोनाने तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. मृतांमध्ये सातारा तालुक्यातील ४, कराड तालुक्यातील ३, फलटण व पाटण तालुक्यातील प्रत्येकी २, खटाव तालुक्यातील १ बाधिताचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील मृतांचा आकडा १९२ वर गेला आहे. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले असून कोरोना बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण चिंताजनक आहे. सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील १७४ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असून कोरोना बाधितांचा आकडा ५ हजार ९३९ पर्यंत पोहोचला आहे. सातारा, कराड तालुक्यांमध्ये कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ५३ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर ६६३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील २७, खंडाळा तालुक्यातील १, खटाव तालुक्यातील १, महाबळेश्वर तालुक्यातील १, कोरेगाव तालुक्यातील १, सातारा तालुक्यातील १०, माण तालुक्यातील १, पाटण तालुक्यातील ६, वाई तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!