
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २०: फलटण शहरातील मलठण या भागामध्ये दररोज पंधरा ते वीस कोरोनाबाधित रूग्ण हे सापडत आहेत. मलठणमधील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या पुढाकाराने श्री कृपासिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५० बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती श्री कृपासिंधु स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीता संजय घाडगे यांनी दिली.
