दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । सातारा । बामणेवाडी (भांबे) ता. पाटण येथील पवनचक्कीच्या टॉवरवरील ४४ हजार रुपये किमतीची कॉपर वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ सप्टेंबर रोजी बामणेवाडी येथील टॉवर नंबर डब्ल्यू ५० पवनचक्की टॉवर वरील ४४ हजार रुपये किमतीची कॉपर वायर अज्ञात चरट्याने चोरून नेल्याची तक्रार दीपक वसंत घाडगे रा. म्हावशी, ता.पाटण यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली.