“‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । बेल्लारी/नवी दिल्ली । ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादाला आता राजकीय रंग लागला आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि मुस्लीम संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत आणि या चित्रपटाच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या चित्रपटाचा संदर्भ देत काँग्रेस समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी उभा असल्याचा आरोप केला.

काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर आहे. जेव्हा-जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखते, असे पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेस दहशतवादावर बोलत नाही
व्होटबँकेसाठी काँग्रेस दहशतवादावर बोलत नाही याचे आश्चर्य वाटते. दहशतीच्या वातावरणात इथले उद्योगधंदे, येथील शेती, वैभवशाली संस्कृती सगळंच उद्ध्वस्त होईल. आज काँग्रेस दहशतवादाविरोधात एक शब्दही उच्चारण्याची हिंमत करत नाही. – नरेंद्र, मोदी,  पंतप्रधान

प्रियांका गांधींना नमाज पढताना पाहिले  
प्रियांका गांधींना रस्त्यावर नमाज पढताना पाहिले आहे. काँग्रेसने हनुमान मंदिराचा खोटा दावा करू नये, कारण नमाज पढणारे कधीच मूर्तीची पूजा करत नाहीत. – स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

खोटे बोलण्याचा घाणेरडा आजार  
स्मृती इराणी यांना खोटे बोलण्याचा घाणेरडा आजार जडला आहे. कर्नाटकात पोहोचताच त्या बरळत आहात. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या ४०% कमिशन घेणाऱ्या भ्रष्ट सरकारवर उत्तर द्यावे लागेल, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!