मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । मुंबई । प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जळगाव येथील शिवांगी काळे हिने ‘वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने ‘नव संशोधन’ मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयम पाटील याने ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!