जागतिक कासपठार बाबत समाज माध्यमातून संभ्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


विविध रंगांची फुले आत्ताच उमल्ल्याची समाज माध्यमातून चुकीची माहिती

स्थैर्य, सातारा, दि. १४ : सातारा जिल्ह्यात असलेल्या आणि सातारा शहरापासून केवळ २२ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार येथे सध्या विविध रंगांची अनोळखी फुले उमलली असल्याची धक्कादायक मात्र चुकीची माहिती सध्या व्हॉट्स ऍप वरून फोटो सह संपूर्ण देशात पाठवली जात आहे..हा फोटो बनावट असून कास पठार येथे येणाऱ्या फुलाशी त्याचा काहीही संबंध नाही असा खुलासा पर्यावरण प्रेमी आणि उप वन सम्म्रक्षक यानी केला आहे.

कास पठारावर जगातील अनेक दुर्मिळ ,अतिदुर्मिळ व धोका उत्पन्न झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींचे भांडार सापडते सध्या कास पठारावर कधीही न उघडणाऱ्या सुंदर फुलांची गर्दी झाली असल्याची पोस्ट व्हाट्सअप वर काहींनी वायरल केली आहे.

हा खोडसाळपणा देशभरातील पर्यटकांच्या नजारा नजर आकाशाकडे वळण्यासाठी आहे मात्र डोंगरपठारावर बहुरंगी फुलांच्या मळ्याचे सोशल मीडियावरील छायाचित्र कास पठाराचे असल्याचे दावा या पोस्टमध्ये  केला आहे. सध्या टाळेबंदी मुळे प्रदूषणाला आळा बसला असून कास पठारावर अशी सुंदर फुले उमलली आहेत असा खोटा प्रचार सोशल मीडियावरून होत आहे.

याबाबत जावळीचे वनक्षेत्रपाल रणजितसिंह परदेशी म्हणाले की सध्या वायतुरा ,सफेद रंगाची पाचगणी आषाढ बाहुली, पांढऱ्या रंगाचे भुईचक्र ,तांबड्या रंगाची जंगली हळद याशिवाय शतावरी ,रानजाई ,मोहरी  रानफुले कास पठारावर विरळ प्रमाणात पाहायला मिळत आहेत .हा काही कास च्या फुलांचा पूर्ण बहराचा काळ नाही.

वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर कास पठारावरील सद्य स्थिती दर्शविणारी माहिती कायम उपलब्ध करून दिलेली असते त्यामुळे पर्यटकांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहिती तपासून घ्यावी खातरजमा न करता पोस्ट पुढे पाठवू नये अशी माहिती कोणी प्रसारित केली तर तो दंडात्मक गुन्हा आहे अशी माहिती उपवनसंरक्षक डॉक्टर भारत सिंग हुडां यांनी दिली आहे.

दरम्यान जुलैच्या पावसानंतर चांगले उन मिळाल्यावरच आणि हलका पाऊस झाल्यावरच रानफुलांचा बहर दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान पाहायला मिळतो. पठारावरील फुलांचे एकाच रंगातील लांबलचक पसरलेल्या विस्तीर्ण पाहायचे असतील तर त्याला सर्व पर्यटकांना ऑगस्ट अखेरीची वाट पाहावी लागत लागणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!