जिंती येथे मारहाण, शिवीगाळ व दमदाटीच्या परस्परविरोधी तक्रारी; तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ जानेवारी २०२४ | फलटण |
जिंती (ता. फलटण) गावच्या हद्दीत बुध्द विहार समाज मंदिराजवळ दि. २५ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या मारहाण शिवीगाळ व दमदाटी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून दोन्ही बाजूच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

विपुल कैलाश रणवरे (वय ४०, रा. जिंती) व आप्पा उर्फ सदाशिव गणपत कांबळे (वय ३६), राणी सदाशिव कांबळे (दोघेही रा. जिंती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जिंती (ता. फलटण) गावच्या हद्दीत बुध्द विहार समाज मंदिराजवळ दि. २५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वरील आरोपीपैकी विपुल कैलाश रणवरे (याने कुस्त्यांच्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून त्याने त्याच्या हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सदाशिव गणपत कांबळे यांनी पोलिसात दिली आहे.

दरम्यान, याच घटनेतील दुसर्‍या तक्रारीत आप्पा उर्फ सदाशिव गणपत कांबळे व राणी सदाशिव कांबळे दोघे (दोघेही रा. जिंती) यांनी फिर्यादी विपुल कैलाश रणवरे व आप्पा उर्फ सदाशिव गणपत कांबळे व त्यांची पत्नी राणी कांबळे यांच्यातील कुत्र्यांच्या भांडणाच्या कारणावरून कांबळे पती-पत्नीने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात लोखंडी खुरपे मारून त्यांना जखमी केले व शिवीगाळ दमदाटी केली, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

या घटनेचा अधिक तपास पो. ना. आडके करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!