यशवंतराव चव्हाण हायस्कूल व श्रीमंत मालोजीराजे विद्यामंदिरात अपर्णा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण


दैनिक स्थैर्य | दि. २६ जानेवारी २०२४ | फलटण |
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, श्री. नामदेवराव बेडके महाविद्यालय तसेच सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलज व श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिरात संगिनी फोरमच्या अध्यक्षां अपर्णा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सचिन भैय्या सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष पवार सर, संचालक मंगेशशेठ दोशी, शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), तारळकर, निकम, सर्व कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक मालोजीराजे प्रशालेच्या मुख्याध्यापिका बेडके मॅडम तसेच संगिनी फोरमच्या सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, माजी अध्यक्षा नीना कोठारी, माजी सचिव पौर्णिमा शहा, प्राजक्ता शहा, संगिनी सदस्या सारिका दोशी, ममता दोशी, नेहा दोशी, संध्या महाजन, नीता दोशी, अलका पाटील, विनयश्री दोशी, विनया दोशी, दीपिका व्होरा, जयश्री उपाध्ये उपस्थित होत्या.

कार्यक्रमात संगिनी फोरम सदस्यांच्या सौजन्याने श्रीमंत मालोजीराजे प्राथमीक विद्यालयातील विद्यार्थ्यांनां १५० वह्यांचे वाटप करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!