दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटण येथील सद्गुरू शिक्षण सस्था संचलित ब्रीलियंट इंग्लीश मीडियम स्कूल व हणमंतराव पवार हायस्कूल व आनंदवन प्राथमिक विद्यामंदीर या तिन्ही शाळांचे संयुक्तपणे जैन सोशल ग्रुप फलटणचे सचिव प्रीतमभाई शहा (वडूजकर) व आर्किटेक्ट अभयसिंह भोसले (मुंबई) यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी सद्गुरू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, विद्यमान अध्यक्ष तुषार गांधी तसेच अॅड. मधुबाला भोसले, तेजसिंह भोसले, रणजित भोसले व पदाधिकारी तसेच जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष राजेंद्रभाई कोठारी, सचिन शहा, संचालक डॉ. मिलींद दोशी, हर्षद गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यशस्वी विद्यार्थ्यांनां प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी जैन सोशल ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.