
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण विधानसभा मतदासंघातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवडणूक संदर्भातील कायदेशीर प्रशिक्षण आज पंचायत समिती सभागृहात घेण्यात आले. या प्रशिक्षणावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व पोलीस अधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती.
