१८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी फलटणमध्ये लसीकरणाची सुरवात : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. ०७: सध्या फलटण शहरामध्ये कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. तरी कोरोनावर जर आपल्याला लढायचे असेल तर कोरोना प्रतिबंधक लस ही एकमेव ढाल आपल्याकडे आहे. शासनाने १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला होता. परंतु लसीची उपलब्धता झालेली नव्हती. त्या मुळे फलटणमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेले नव्हते. जिल्हा प्रशासनाकडून नुकतीच १८ ते ४४ वयोगटासाठी कोवॅक्सीन ही लस फलटण साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी ज्या २०० जणांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे. अनावश्यक गर्दी लसीकरण केंद्रावर करू नये, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.

१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त कोवॅक्सीन लस उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्यांच्या यादीमध्ये नमूद २०० व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींनी केंद्रावर गर्दी करु नये. मुधोजी हायस्कूल येथे आज दि. ०७ मे २०२१ पासुन सकाळी १० वाजता लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

४५ वर्षे व अधिक वयोगट व कोवॅक्सीन चा दुसरा डोस असणाऱ्या व्यक्तींना दि. ७ मे २०२१ रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. त्याबाबत नंतर माहिती दिली जाईल. फलटण येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (बाहुली शाळेजवळ) येथे कोणतीही लस उपलब्ध नसल्याने दि ०७ मे २०२१ रोजी लसीकरण पूर्ण बंद राहील, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!