दैनिक स्थैर्य | दि. 07 सप्टेंबर 2023 | राजगड | छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी, छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री व फलटणच्या ऐतिहासिक नाईक निंबाळकर राजघराण्यातील राजकन्या श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाईसाहेब यांचा “स्मृतिदिन” राजगड पायथ्याच्या पाल खुर्द गावी, गुंजवणी नदीकिनारी असणाऱ्या समाधी स्थळावर संपन्न झाली.
यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उमेश नाईक निंबाळकर, युवा नेते तुषार नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, वीरधवल नाईक निंबाळकर, राहुल नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर, नानासाहेब धुमाळ, हेमंतराव नाईक निंबाळकर, प्रदीप मरळ, डॉ. दामोदर मगदूम, संग्राम कोंडे – देशमुख, योगेश दरडीगे, निलेश भोसले, ज्ञानेश्वर मोकळ, विजय तुपे व अर्जुन रवाटपे यांची उपस्थिती होती.