महाविद्यालयांना समान संधी केंद्र स्थापन करण्याचे अवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सातारा । महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला मुलींना शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धापरिक्षा मार्गदर्शना सोबतच उद्योजकता व्यावसाय व रोजगार निर्मीतीसाठी आर्थिकबाबींचे मार्गदर्शन करणे तसेच संवाद अभियान, युवा संवाद अभियान या सारखे उपक्रम समान संधी केंद्रामार्फत राबविण्यात यावेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांनी  जिल्ह्यातील  सर्व महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठी वेळोवेळी अवाहन केलेलेआहे.

जिल्ह्यात एकुण 327 महाविद्यालये असुन त्यापैकी केवळ 213 महाविद्यालयांनी समान संधी केंद्राची स्थापन केली आहे. ज्या महाविद्यालयांनी समान संधी केंद्र स्थापन केलेले नाही.त्यांनी  तात्काळ सुरु करावे व जास्तीत जास्त मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा याद्वारे लाभ देण्यात यावा. जी महाविद्यालये आपल्या महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करणार नाहीत अशा महाविद्यालयांवर आयुक्त ,समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून कारवाई केली जाणारआहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये  समान संधी केंद्र स्थापन झालेली नाहीत.  अशा  महाविद्यालयातील मागासवर्गीय प्रवेशित विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांच्याशी संपर्क करण्याबाबतचे अवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नितीन उबाळे, यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!