फलटणच्या शहर पोलीस निरीक्षक पदी हेमंतकुमार शहा; संगिनी फोरम कडुन स्वागत


दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | धर्म नगरी फलटणच्या शहर पोलीस निरीक्षक पदी नुकतीच हेमंतकुमार शहा यांची नियुक्ती झाली. फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे संगिनी फोरम कडुन स्वागत करुन शाल, श्रीफळ, मोत्याची माळ, जिनवाणी भेट देऊन साहेबांचा यथोच्चीत सत्कार अध्यक्षां सौ. अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया यांचे हस्ते संपन्न झाला.

संगिनी फोरमच्या माजी सचिव दिप्ती राजवैद्य यांनी प्रास्ताविक करून साहेबांचा परिचय करुन दिला व संगिनि फोरमच्या सामाजीक कार्याचा आढावा सादर केला.

यावेळी माजी अध्यक्षा सौ. संगिता दोशी, निना कोठारी, माजि सचिव पोर्णिमा शहा, माजी खजिनदार संगिता जैन, संगिनि सदस्या किशोरि शहा, जयश्री ऊपाध्ये, सारिका दोशी, सुरेखा ऊपाध्ये, वुषाली गांधी उपस्थित होत्या.

सत्काराबद्दल हेमंतकुमार शहा यांनी आभार मानत संगिनी फोरमला सामाजिक कार्यात सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल; असे प्रतिपादन करुन संगिनी फोरमच्या सामाजिक कार्या बद्दल प्रशंसा करुन शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!