
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. ०५ : फलटण शहरामध्ये सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेल्या आदेश डावलून लग्न समारंभाचे आयोजन केल्याबद्दल वैभव हिरालाल गांधी यांच्यावर फलटण नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करून रूपये २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन करत लग्न समारंभाचे आयोजन केले व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले नाहीत म्हणून वैभव हिरालाल गांधी यांच्यावर रूपये २५ हजारांचा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे, असेही पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी स्पष्ट केले.
