
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील मंगळवार पेठ येथे आज वीज कर्मचारी घरात असलेले वीज मीटर ग्राहकांना न विचारता बाहेर काढू लागल्याने येथील नागरिक संतप्त झाले होते. यावेळी राग अनावर झालेल्या नागरिकांनी वीज कर्मचार्यांना या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत येथील नागरिकांनी वीज कर्मचार्यांवर प्रश्नांचा भडीमार करत वीज अधिकार्यांनी मीटर बाहेर काढण्याअगोदर आम्हाला विचारले होते का? असे सवाल करत आपापल्या घरातील मीटर बाहेर काढण्यास मनाई केली. त्यामुळे या परिसरात वीज कर्मचारी व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते.
