ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १७ जानेवारी २०२३ । मुंबई । माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या निधीस सढळ हाताने मदत करावीअसे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव ल. गो. ढोके यांनी केले आहे.

माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात ७ डिसेंबर हा दिवस ध्वज दिन’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलित केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केलेअशा जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. मे १९९९ पासून जम्मू- काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या युद्धजन्य तणावाची परिस्थिती हाताळताना अथवा देशातील सर्वच क्षेत्रातअंतर्गत सुरक्षा मोहिमेतचकमकीत धारातीर्थी पडलेल्या सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील महाराष्ट्रातील अधिकारीजवानांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी १ कोटी रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.

या कार्यवाहीत अपंगत्व आलेल्या या दलातील महाराष्ट्राचे अधिकारी व जवानांना त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाण लक्षात घेवून राज्य शासनातर्फे २० ते ६० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. याशिवाय अन्य योजनांनुसार राज्यातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य केले जाते. माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वज दिन निधीचा विनियोग केला जातो. यंदा राज्यासाठी ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करून कालबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्तजिल्हा उद्योग अधिकारीशिक्षणाधिकारीजिल्हा माहिती अधिकारी सदस्य असून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सदस्य सचिव आहेत.

कोणत्याही प्रकारच्या माजी सैनिक संघटनांना सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलीत करता येणार नाही. ध्वज दिन निधीस योगदान द्यावयाचे असल्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी व अध्यक्षजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि विभागीय स्तरावर संचालकसैनिक कल्याण विभाग यांच्या नावाने धनादेशाद्वारे जमा करावे.

ध्वज दिन निधी संकलनाचे जिल्हानिहाय उद्दिष्ट असे : कोकण विभाग : मुंबई शहर व मुंबई उपनगर- ३ कोटी ८२ लाख ९४ हजार रुपये (प्रत्येकी). ठाणे- १ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये. पालघर- २५ लाख ४८ हजार रुपये. रायगड- ६० लाख ९८ हजार रुपये. रत्नागिरी- ६१ लाख १८ हजार रुपये. सिंधुदुर्ग- ३६ लाख ९९ हजार रुपये. नाशिक विभाग- नाशिक- १ कोटी ३८ लाख ६७ हजार रुपये. धुळे- ६१ लाख १८ हजार रुपये. नंदुरबार- ३६ लाख ३० हजार रुपये. जळगाव- १ कोटी १८ लाख १० हजार रुपयेअहमदनगर- १ कोटी ८४ लाख ९८ हजार रुपये. पुणे विभाग- पुणे- २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपयेसातारासांगली- १ कोटी ४२ लाख २९ हजार रुपये (प्रत्येकी)सोलापूर- १ कोटी ५४ लाख ४१ हजार रुपयेकोल्हापूर- १ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये. औरंगाबाद विभाग- औरंगाबाद- १ कोटी २० लाख रुपयेजालना- ३८ लाख ३० हजार रुपयेपरभणी- ३५ लाख ४५ हजार रुपयेहिंगोली- २८ लाख रुपयेबीड- ३५ लाख ३० हजार रुपयेनांदेड- ४५ लाख ३० हजार रुपयेउस्मानाबाद- ५१ लाख २८ हजार रुपयेलातूर- ४२ लाख २२ हजार रुपये. अमरावती विभाग- अमरावती- १ कोटी १० लाख रुपयेबुलढाणा- ५३ लाख ३८ हजार रुपयेअकोला- ७३ लाख ३० हजार रुपयेवाशीम- ४८ लाख ५३ हजार रुपयेयवतमाळ- ५९ लाख ६८ हजार रुपये. नागपूर विभाग- नागपूर- १ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपयेवर्धा- ६० लाख ६१ हजार रुपयेभंडारा- ३५ लाख ४५ हजार रुपयेगोंदिया- ३३ लाख ४५ हजार रुपयेचंद्रपूर- ३९ लाख ८४ हजार रुपयेगडचिरोली- २७ लाख ७६ हजार रुपये.

विभागनिहाय ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट असे : कोकण – ११ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपयेनाशिक – ५ कोटी ३९ लाख २३ हजार रुपयेपुणे- ८ कोटी ५९ लाख ६३ हजार रुपयेऔरंगाबाद- ३ कोटी ९५ लाख ८५ हजार रुपयेअमरावती- ३ कोटी ४४ लाख ८९ हजार रुपयेनागपूर- ३ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये. एकूण ३६ कोटी ६४ लाख रुपये.


Back to top button
Don`t copy text!