खंडाळा साखर कारखान्यासाठी चुरशीने 79.71 मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | खंडाळा | खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखाना लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज चुरशीने 79.71 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये 9 हजार मतदारापैकी तब्बल 7 हजार 174 मतदारांनी मतदानाचा मतदानाचा हक्क बजावला असून एका अपक्ष उमेदवारांसह 43 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदान पेटीमध्ये बंद केले आहे.मंगळवार दि.19 ऑक्टोबर रोजी खंडाळा येथील खंडाळा पंचायत समितीच्या किसनवीर सभागृह याठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटण प्रातांधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी 26 मतदान केंद्राद्वारे मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. याकरिता सहा झोनल अधिकार्‍यांसहित तब्बल 180 कर्मचार्‍यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी 9 हजार मतदारापैकी तब्बल 7 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण 79. 71 टक्के मतदान झाले. दरम्यान,बाळसिद्धनाथ संस्थापक सहकार पॅनल व खंडाळा तालुका शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यामध्ये मुख्य लढत होत असून माजी आमदार तथा किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले,विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे.आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार मोहीम राबविण्यात आल्याने निवडणुकीमध्ये रंगात निर्माण झाली होती. यावेळी सहा गटातील 21 उमेदवारासाठी अपक्ष उमेदवारासह 43 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने 26 केंद्रातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत 43 उमेदवाराचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद केले आहे. यावेळी मंगळवार दि.19 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून किसनवीर सभागृह याठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.


Back to top button
Don`t copy text!