
![]() |
वडूज-महाविकास आघाडी च्या उमेदवार प्रचारार्थ बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील,शेजारी ना रामराजे,आ. शशिकांत शिंदे व इतर
स्थैर्य, वडूज, दि.२३: संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १डिसेंबर ला होणाऱ्या शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदार संघातील निवडणूकित पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडी तील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण आण्णा लाड व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर या दोन उमेदवाराना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी केले.
अरुण लाड व जयंत आसगावकर या दोन उमेदवारांच्या खटाव तालुक्यातील प्रचारादरम्यान वडूज येथील अक्षदा मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष यांच्या संयुक्त प्रचार मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते.
बुध येथे तरुणाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना रामराजे नाईक निंबाळकर,कोरेगाव चे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे,माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख,राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव,माजी सभापती अशोकराव गोडसे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप
अण्णा विधाते,सोशल मीडिया चे प्रमुख सारंग पाटील, प्रा अर्जुन राव खाडे,डॉ विवेक देशमुख,जितेंद्र दादा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरेंद्र दादा गुदगे,डॉ सुरेश जाधव,प्रा बंडा गोडसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रभाकर देशमुख यांनी आपल्या मनोगताद्वारे “बाहेर च्या राज्यात,शहरात असलेल्या मतदाराना मतदानासाठी घेऊन येणे व परत सोडणे आवश्यक असल्याचे सांगितले “.
आमदार शशिकांत शिंदे यांनी मात्र यावेळी थोडा आक्रमक पवित्रा घेऊन “ही महाविकास आघाडी ची एकत्रित लढाई आहे,विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वर कधी तर कधी पवार साहेबांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत , पण ज्यावेळी या मोठ्या नेत्यांवर विविध प्रकारचे बिनबुडाचे आरोप होतात तेव्हा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला पाहिजे.आदरणीय शरद पवार साहेबांच्या”भर पावसातल्या सभेने इतिहास बदलला”हे ध्यानात ठेवूनच प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केले तरंच या निवडणुकीत यश मिळवणं सोपं होईल, असंही आमदार शिंदे म्हणाले.
भराव तुटल्याने कार्वे नळ योजनेस धोका; जॅकवेलला ‘जलसमाधी’ची शक्यता!
आपल्या अध्यक्षीय भाषणात विधानपरिषदेचे सभापती ना रामराजे नाईक निंबाळकर यांनी” शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणूक ही सुशिक्षित मतदारांची निवडणूक असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे,त्यासाठी झपाटून काम करा व महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन यावेळी केलं. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी सभापती संदीपदादा मांडवे यांनी केले. कार्यक्रमास बाळासाहेब सोळस्कर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,जिल्हा युवा अध्यक्ष तेजसदादा शिंदे,जिल्हा महिला आघाडी च्या कविता म्हेत्रे,मानसिंग राव माळवे,संतोष घार्गे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार,रवींद्र सानप,नगराध्यक्ष सुनील गोडसे,डॉ महेश गुरव,अप्पासाहेब गोडसे,अभय देशमुख, अक्षय थोरवे,राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते