दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सातारा । केंद्रीय सैनिकबोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या मुलीसाठी रक्कम रु. 36 हजार व मुलासाठी 30 हजार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी 12 वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविले आहेत व ज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीच्या अधिक माहिती www.ksb.gov.in या संकेतस्तळावर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.