मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना लस, जे. जे. रुग्णालयामध्ये घेतला कोरोना लसीचा पहिला डोस


स्थैर्य, मुंबई, दि.११: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली आहे. मुख्यमंत्री यांनी जे. जे. रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोव्हॅक्सीन ही लस त्यांनी घेतली आहे. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या मातोश्री यांनी देखील लस घेतली आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली होती. त्यांनी सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली होती.

जनतेला लस घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. जे लोक कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी अवश्यक लस घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मनात कोणतीही शंका न आणता लस घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच लसीकरणाची सुरुवात झाली होती. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलाही लस देण्यात आली होती. 13 फेब्रुवारीपासून हेल्थकेअर वर्कर्सला दुसरा डोज देण्यात येत आहे. फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्याची सुरुवात 2 मार्चला झाली. 1 मार्चपासून सरकारने सीनियर सिटीजन आणि 45-59 वर्षांच्या गंभीर आजाराचा सामना करत असलेल्या लोकांना लसीकरणात सामिल करण्यात आले. यासोबतच खासगी रुग्णालयांनाही लस देण्यासाठी अधिकृत केले. यानंतरपासून आकड्यांमध्ये वाढ होत आहे.


Back to top button
Don`t copy text!