मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, मुंबई, दि.7: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात राजे उमाजी नाईक यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ काढून अनेक घटकांना संघटित करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले. अशा या महान आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!