बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा सुवर्ण महोत्सवी विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भारतीय शहीद वीरांना अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । मुंबई । बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केले आहे. या युद्धातील शहीद वीर जवानांच्या स्मृतींनाही त्यांनी अभिवादन केले आहे.

संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा आज सुवर्ण महोत्सवी विजय दिवस. या युद्धातून भारतीय सैन्याने जगासमोर मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी शौर्य आणि धैर्याचे उत्तम उदाहरण ठेवले. आपल्या शूरवीरांनी प्राणांची बाजी लावली, यात महाराष्ट्र सुपुत्रांनीही पराक्रमाची शर्थ केली. या युद्धातील शहीद वीर जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. या सर्वांच्या त्याग, समर्पणाला शतशः वंदन तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्ततेलाही नमन.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!