
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटनमंत्री बेदू सिंग पंथ हे देखील उपस्थित होते. तमांग यांनी राज्यपालांना सिक्कीमच्या प्रसिद्ध थांका चित्रशैलीचे पेंटिंग भेट दिले.
