
स्थैर्य, फलटण, दि. ३१ : कोरोना साथीच्या संदर्भात काम करताना शासनाच्या सेवेत कर्मचार्यांचा, अधिकार्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना रु.50 लाखाचे विमा कवच दिनांक 28 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार आपण जाहीर केले आहे. याबद्दल राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने राज्य शासनाचे विशेष अभिनंदन परंतु, या शासन निर्णयात एक तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी, विविध आरोग्य सेवा कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्याबरोबरीने या कोरोना साथीसाठी वार्तांकन, लोकजागृती यासाठी धाडसाने पत्रकार काम करत आहेत. या शासन निर्णयातील वरील संवर्गामध्ये असे काम करणारे पत्रकार यांचाही समावेश करावा अशी पत्रकारांची विनंती आहे, अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या मार्फत पाठवण्यात आलेले आहे.
हे निवेदन देताना फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सौ. अमिता गावडे, फलटण नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रमेश आढाव, नसिर शिकिलगार, यशवंत खलाटे, बाळासाहेब ननावरे, सुधीर अहिवळे, रोहित अहिवळे, किरण बोळे, विक्रम चोरमले, प्रा. सतीश जंगम, सतीश कर्वे, अशोक (शक्ती) भोसले, सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.