• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन करावे – क्रीडामंत्री गिरीष महाजन

जळगावात ११ ते १५ मार्चदरम्यान आयोजन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 5, 2023
in प्रादेशिक

दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । जळगाव । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 11 ते 15 मार्च, 2023 दरम्यान सागरपार्क मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक क्रीडामंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, शाम कोगटा, नितीन बरडे, डॉ प्रदिप तळवेलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

क्रीडामंत्री पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला कबड्डीची चांगली परंपरा आहे. जिल्ह्यातील कबड्डीपट्टूनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 11 ते 15 मार्च, 2023 या कालावधीत सागरपार्क मैदान येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धांसाठी राज्यातील विविध जिल्ह्याचे पुरुषांचे 16 व महिलांचे 16 असे एकूण बत्तीस संघ सहभागी होणार आहे. या संघामध्ये विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघातील 12 खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक व 1 व्यवस्थापक असा एकूण 14 जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत 384 कबड्डीपट्टू, 100 सरपंच, पंच व पदाधिकारी, अधिकारी तसेच 50 स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण 550 जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सागरपार्क मैदानावर चार कबड्डीचे मैदान तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला 1 लाख 50 हजार रुपयांचे तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी व इतर संघानाही बक्षिसे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी सागरपार्क मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी बैठकीत दिली.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे. बैठकीत खासदार श्री. पाटील, आमदार श्री. पाटील, भोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडामंत्र्यांनी बैठकीत सांगितले.


Previous Post

वाजवी दरात औषधे मिळण्यासाठी जन औषधी केंद्रे

Next Post

गावात स्वच्छता व कामकाजात पारदर्शकता महत्त्वाची – गुलाबराव पाटील

Next Post

गावात स्वच्छता व कामकाजात पारदर्शकता महत्त्वाची - गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!