
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सातारा | शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, पाटण यांच्या वतीने शनिवार दि. ०३ जुन २०१३ रोजी दुपारी ०४ वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर ( मरळी) ता. पाटण येथे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित केल्याची माहिती औदयोगिक प्रशिक्षण संस्था पाटणचे प्राचार्य मनिष मोरे यांनी दिली.
या शिबीरामध्ये व्यक्तीमत्व विकास, इ.१० वी., इ.१२ वी नंतरच्या करिअरच्या संधी. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण इ. विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
