सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीकडे झेपावणारे छत्रपती गणेशोत्सव मंडळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटणमधील भैरोबा गल्लीत असणारे छत्रपती गणेशोत्सव मंडळ सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीकडे वाटचाल करत आहे. या मंडळाने अनेक वर्ष ‘श्रीं’चे आकर्षक गणेशमूर्तीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

छत्रपती गणेशोत्सव मंडळ, भैरोबा गल्ली, फलटण या मंडळाची यंदाच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे गणेश भक्तांच्या आशिर्वादामुळे वाटचाल होत असून छत्रपती गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७५ साली झाली असून यंदाच्या वर्षी हे मंडळ सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

हे मंडळ प्रतिवर्षी ‘श्रीं’च्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करीत असते, यामुळे या मंडळाला अनेक वर्षापासून ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

यंदाच्या वर्षी या मंडळाने फलटणमध्ये प्रथमच शिवपुत्र तथा श्री गणरायाचे ज्येष्ठ बंधू सारथी भगवान ‘कार्तिक स्वामी’ यांचे वाहन मयूर मोरावर आरुढ झालेली ‘श्रीं’च्या आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

ही मूर्ती मूर्तीकार श्री. गणेश जाधव, गणसंकुल, आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, करी रोड, लालबाग, मुंबई यांच्याकडून आणण्यात आली आहे.

ही मूर्ती पाहण्यासाठी फलटण शहरातून व तालुक्यातून असंख्य भाविक भक्त येत आहेत.


Back to top button
Don`t copy text!