
![]() |
शेतकरी परिसंवादाचे उद्घाटन प्रसंगी संदिप मांडवे समवेत अजित वाघ व मान्यवर.(छाया :समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. २० : शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकास खत देताना त्या जमिनीचा पोत तपासून खतमात्रा द्यावी असे आवाहन खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे यांनी केले.
चौकीचा आंबा येथील सद्गुरु कृषी सेवा केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. यावेळी जि. प. चे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, बाजार समितीचे माजी सभापती विजय काळे, भोसरेचे सरपंच नितीन जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, युवा कॉन्ट्रॅक्टर संभाजी पवार, मोहनराव वाघ, आप्पा मांडवे, गोरख वाघ, सोमनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मांडवे म्हणाले, एकच पीक वारंवार घेण्यामुळे शेतीचे नुकसान होत असते. अश्यावेळी कितीही रासायनिक खताचा वापर केला तरी त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी बदलून पिके घ्यावीत. रासायनिक खताबरोबरच सेंद्रीय खताचा वापर करावा. दोन्ही प्रकारच्या खताचा संतुलित वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होवू शकते.
संचालक अजित वाघ यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी माहिती देताना त्यांनी शेतकर्यांना सर्व प्रकारच्या रासायनिक खताबरोबरच गांडूळ खत, जीवाणू खत, जय किसान खत, हिमालया, अंकुर, निंबोडी पेंड आदी योग्य दरात मिळवून देण्याची ग्वाही दिली. प्रा. गोडसे यांनी चौकीच्या आंबा या मध्यवर्ती ठिकाणी अश्या प्रकारची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. वाघ व सहकार्यांचे कौतुक केले.