
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, वडूज, दि 12 : विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाळासाहेब देशमुख व राजू फडतरे दोघेही रा. कुमठे, ता. खटाव अशी संशयीतांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, संबंधित महिला घरात एकटी असताना संशयीत सुनील देशमुख याने महिलेच्या घरी जावून तिचा विनयभंग केला. तसेच सुनील देशमुख आणि राजू फडतरे यांनी जातीवाचक शिविगाळ करून दांडक्याने हातावर व खांद्यावर मारहाण केली. तसेच तेथे पडलेली विट उचलून पाठीवर व डोक्यात मारले. व अनोळखी युवकांनी मारहाण केली. जवळपासचे दगड उचलून मारल्याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली आहे. यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा अल्ताफ तेथे आला असता त्यासही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
