
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील गोवे येथे फलटण येथील चरेगावकर भजनी मंडळाचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यैवेशी गोवे व लिंब गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
भजनाची सुरुवात नेहमीप्रमाणे पंचपदीने झाली व नंतर भजनी मंडळाच्या सदस्यांनी वैयक्तिकरित्या अभंग गायन सादर केले. सदर कार्यक्रमास सौ. मंगल चरेगावकर, प्रमोद गोळे, सौ. आसावरी गोळे, श्री. पंचवाघ, सौ. उल्का पंचवाघ, ॲड. विजय कुलकर्णी, सौ. आशा कुलकर्णी, प्रदीप जोशी, नंदकुमार जोशी उपस्थित होते.
सर्व गायक सदस्यांना हार्मोनियमची साथ श्रीकांत देशपांडे यांनी केली.
