दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आज पुरातन चांदोबा लिंब मंदिराचे स्थलांतरण आणि नवीन मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यास सुरूवात करण्यात आली. विधीवत पूजा आणि परंपरांचे पालन करत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, मानकरी आणि प्रशासन यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही सुरू आहे.
या स्थलांतरणासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, तरडगाव ग्रामस्थ, पालखी सोहळा मानकरी आणि मंदिर शेजारील शेतकरी व डॉ. काकडे आणि झणझणे यांचे सहकार्य लाभले. फलटणच्या प्रांताधिकारी कार्यालयामार्फत हा समन्वय करण्यात आला आहे.
चांदोबाचा लिंब हे आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामधील पहिले उभ्या रिंगणाचे ठिकाण आहे.