दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबाबांचा अश्विन शुध्द १२ म्हणजेच गुरुवार, दि. २६/१०/२०२३ रोजी प्रकट दिन संपन्न झाला. यानिमित्त फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्या शुभहस्ते आज सद्गुरु हरिभाऊ महाराज यांची आरती संपन्न झाली.
याप्रसंगी सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, माजी नगर अभियंता जीवन केंजळे, अॅड. मिलिंद लाटकर, चंदू वादे, शंकराव गुंजवटे, संभाजीराव नाईक निंबाळकर, मदनलाल करवा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रकट दिनानिमित्त विजयादशमी दिवशी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे शुभहस्ते सद्गुरु हरिबाबांच्या रथाचे पूजन होऊन प्रकट दिन कार्यक्रमास सुरुवात झाली होती. बुधवार, दि. २५ रोजी रात्री ८ वाजता कोल्हापूरच्या सुश्राव्य अशा संतकृपा सोंगी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आज सद्गुरु हरीबाबा महाराज यांच्या रथापुढे फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून सद्गुरु हरिबाबांच्या रथाचे फलटण नगर प्रदक्षिणेसाठी प्रस्थान झाले. सद्गुरु हरिबाबा मंदिर येथे पालखी परत पोहोचल्यानंतर आरती होऊन सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल.
सर्व भाविक भक्तांनी रथ सोहळ्यात सहभागी होऊन सद्गुरु हरिबाबा महाराज सेवेचा लाभ घेतला.